Mahila bal Vikas vibhag Bharti 2024

Mahila bal Vikas vibhag Bharti 2024

Mahila bal Vikas vibhag Bharti 2024 महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती जाहिरात, आयुक्त ,महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दिनस्तपणे वरील गट ब व  राजपत्रित गट क व गट ड या संवर्गातील संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित, परिविक्षा अधिकारी गट क, लघुलेखक उच्च श्रेणी गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक गट क, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क, वरिष्ठ काळजी वाहक गट  ड इत्यादी भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

Mahila  bal Vikas vibhag Bharti 2024 total post

१)संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित- २ पदे

२) परिविक्षा अधिकारी गट क – ७२ पदे

३) लघुलेखक उच्च श्रेणी गट क- १ पद

४) लघुलेखक निम्न श्रेणी गट क – २ पदे

५) वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गट क -५६ पदे

६) संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क- ५७ पदे

७) वरिष्ठ काळजीवाहक गट ड – ४ पदे

८) कनिष्ठ काळजीवाहक गट ड – ३६ पदे

९) स्वयंपाकी गट ड- ६ पदे

Mahila bal Vikas vibhag Bharti 2024

Mahila  bal Vikas vibhag Bharti 2024 official website

सदर सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सुविधा महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे च्या http://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर दिनांक १४/१०/२०२४ पासून उपलब्ध होणाऱ्या लिंक वर उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत भरती प्रक्रिये करता केवळ वरील संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरलेला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज/परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही.

भारतीय प्रक्रिये संदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक, वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना http://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवाराशी कोणत्याही स्वतंत्रपणे व्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारी घ्यावयाची आहे.

Mahila  bal Vikas vibhag Bharti 2024 application date

ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरुवात दिनांक १४-१०-२०२४ दुपारी १५.०० वाजेपासून होणार आहे.  

Mahila  bal Vikas vibhag Bharti 2024 last date

 ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ०३-११-२०२४ रात्री २३.५५ वाजेपर्यंत राहणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेचे आत मध्ये अर्ज भरून घ्यावा.

उक्त भरती प्रक्रिया परीक्षा प्रक्रिया स्थगित करणे किंवा रद्द करणे, यामध्ये अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण किंवा संवर्गनीय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे, सामाजिक ,समांतर, दिव्यांग व इतर आरक्षणामध्ये संवर्गनिहाय पदनिहाय बदल करण्याचे ,सरळ भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे, नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे, अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्वाधिकार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवले असून त्यांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वाद / तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याच्या अधिकार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राहतील त्याबाबत विद्यार्थ्यांना कोणताही दावा सांगता येणार नाही.

तरी सर्व विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईट वरून माहितीपत्रक डाऊनलोड करून संपूर्ण भरती प्रक्रियेची सूचना व्यवस्थित वाचून नंतरच फॉर्म भरावा.

Mahila  bal Vikas vibhag Bharti 2024 Syllabus

महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती जाहिरात क्रमांक ०१/२०२४ या परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम महिला व बालविकास विभागाच्या ऑफिसिअल  वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावा व परीक्षेच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करावा.