शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहिरीच्या अनुदानात वाढ, पहा आता किती मिळेल अनुदान ?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहिरीच्या अनुदानात वाढ, पहा आता किती मिळेल अनुदान ?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहिरीच्या अनुदानात वाढ, पहा आता किती मिळेल अनुदान ? शेतकरी मित्रांनो, विहिरीच्या कमी अनुदानामुळे जर तुम्ही चिंतेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकतेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली आहे,आता शेतकरी आपल्या शेतीसाठी विहीर बांधण्यासाठी अधिक अनुदान मिळू शकतात. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत आता नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये चे अनुदान मिळणार आहे. तसेच तुमच्याकडे जुनी विहीर असेल तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी आहे मोठी आनंदाची बाब आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विहिरीच्या बांधकामासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणली आहे. राज्य सरकारने या योजनेत बदल करून शेतकऱ्यांना विहिरीच्या बांधकामासाठी अधिक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहिरीच्या अनुदानात वाढ, पहा आता किती मिळेल अनुदान ? शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणली आहे. जुने योजनेत बदल करून आता शेतकऱ्यांना विहिरीच्या बांधकामासाठी अधिक अनुदान मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विहिरीच्या अनुदानात वाढ, पहा आता किती मिळेल अनुदान ?

योजनेतील अनुदान वितरण

नवीन विहीर खोदण्यासाठी४ लाख रुपये
जुन्या विहिरीची दुरुस्तीसाठी१ लाख रुपये
इनवेल बोरिंग४० हजार रुपये
विद्युत पंप संच४० हजार रुपये
विज जोडणी२० हजार रुपये
सोलर पंप५० हजार रुपये
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण२ लाख रुपये
ठिबक सिंचन संच९७ हजार रुपये
तुषार सिंचन संच४७ हजार रुपये
डिझेल इंजिन४० हजार रुपये
एचडीपीई/पीव्हीसी पाईप५० हजार रुपये
बैलचलित/ट्रॅक्टर चलित अवजार५० हजार रुपये
परसबाग५० हजार रुपये

योजनेचे लाभार्थी

शेतकरी मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकरी असावा. तसेच त्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी. शेतकऱ्यांच्या आधार कार्ड आणि बँक खाते सोबत लिंक केलेल्या असावे.

अर्ज कुठे करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना http://mahadbt.maharashtra.gov.in./farmer/login   या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल

ही योजना शेतकऱ्यांनची सिंचनाची  समस्या सोडवण्यात मदत करेल,त्यामुळे शेतकरी अधिक उत्पादन घेऊ शकतील आणि त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारेल. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना : अटी  व शर्ती

1. लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.

2. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

3. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी किमान जमीन धारणा 0.40 हेक्टर असणे आवश्यक आहे.

4. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी किमान 0.20 हेक्‍टर शेतजमीन असणे आवश्यक.

5. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 6 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक.

6. शेत जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा असणे आवश्यक.

7. शेतकऱ्याचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला व शेतकऱ्याचे सर्व मार्गाने  मिळणारे वार्षिक उत्पन्न 150000/- रुपये पेक्षा जास्त नसावे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना : आवश्यक कागदपत्रे

शेतकरी मित्रांनो सदर योजने अंतर्गत विविध घटकांतील पॅकेजचा लाभ घेण्यासाठी पुढील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

1.  सक्षम प्राधिकारी याचे कडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.

2.  सातबारा व आठ अ उतारा तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

3.  लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपर.

4.  तलाठी चा सामायिक एकूण धरणाक्षेत्राबाबतचा दाखला.

5.  विहीर नसल्याचे प्रमाणपत्र.

6.  प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतु:सीमा.

7.  भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.

8.  कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाणी व शिफारस पत्र.

9.  गटविकास अधिकारी शिफारस पत्र.

10. जागेचा फोटो.

11. ग्रामसभेचा ठराव.

12. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

13. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डची संलग्न असणे आवश्यक आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना : अटी व शर्ती

1. लाभार्थी हा अनुसूचित जमाती चा  शेतकरी असला पाहिजे.

2. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

3. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी किमान जमीन धारणा 0.40 हेक्टर असणे आवश्यक आहे.

4. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी किमान 0.20 हेक्‍टर शेतजमीन असणे आवश्यक.

5. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 6 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक.

6. शेत जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा असणे आवश्यक.

7. शेतकऱ्याचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला व शेतकऱ्याचे सर्व मार्गाने  मिळणारे वार्षिक उत्पन्न 150000/- रुपये पेक्षा जास्त नसावे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना : आवश्यक कागदपत्रे

1.  सक्षम प्राधिकारी याचे कडील अनुसूचित जमातीचे  जात प्रमाणपत्र.