Samaj Kalyan Bharti 2024
Samaj Kalyan Bharti 2024 सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी मित्रानो,समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/ अधीक्षक (महिला) गृहपाल /अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटांकलेखक या संवर्गातील खालील नमूद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी आवश्यक असलेली अहर्ता किंवा पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Samaj Kalyan Bharti 2024 total post
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एकूण पदे -५
- समाज कल्याण निरीक्षक एकूण पदे-३९
- गृहपाल /अधीक्षक (warden) महिला एकूण पदे-९२
- गृहपाल /अधीक्षक (warden )सर्वसाधारण एकूण पदे- ६१
- उच्च श्रेणी लघुलेखक एकूण पदे- १०
- निम्न श्रेणीला लघुलेखक एकूण पदे- ३
- लघु टंकलेखक एकूण पदे- ९
Samaj Kalyan Bharti 2024 pay scale
१) उच्च श्रेणी लघुलेखक – S-१६:४४९००-१४२४००
२) गृहपाल /अधीक्षक (महिला)- S-१४:३८६००-१२२८००
३) गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण)- S-१४:३८६००-१२२८००
४) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक- S-१४:३८६००-१२२८००
५) निम्न श्रेणी लघुलेखक- S-१५:४१८००-१३२३००
६) समाज कल्याण निरीक्षक- S-१३:३५४००-११२४००
७) लघु टंकलेखक- S-८:२५५००-८११००
Samaj Kalyan Bharti 2024 age limit
वरील पदांसाठी कमीत कमी वयोमर्यादा ही अठरा वर्षे पूर्ण झालेली असावी तसेच कमाल वयोमर्यादा ही व मागास प्रवर्गासाठी ३८ वर्ष तर मागास प्रवर्गासाठी ४३ वर्ष आहे.
Samaj Kalyan Bharti 2024 educational qualification
- गृहपाल /अधीक्षक (सर्वसाधारण )गृहपाल/ अधीक्षक (महिला )- अ)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य)
ब) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक –अ )शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता.
ब) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) समाज कल्याण निरीक्षक-अ)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता
ब) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
४) उच्च श्रेणी लघुलेखक-अ) शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची एसएससी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
ब)१) उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी)-शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण, किंवा
२) उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी)-शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रतिमिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण.
वरील ब मधील १ व २ करिता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)
क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा
ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट.
इ) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
५) निम्न श्रेणी लघुलेखक- अ) शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची एसएससी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
ब)१) उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी)-शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण, किंवा
२) उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी)-शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रतिमिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण.
वरील ब मधील एक व दोन करिता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)
क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा
ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट
इ) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
६) लघु टंकलेखक- अ)शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची एसएससी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
ब) लघु लेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रतिमिनिट या आहार अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहिजे. (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडील प्रमाणपत्र)
अहर्ता/पात्रता गणण्याचा दिनांक:-
१)अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांक पर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असणे अनिवार्य आहे.
२)शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अहर्ता सादर करण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे.
Samaj Kalyan Bharti 2024 last date
अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक १०/१०/२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ११/११/२०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील.
Samaj Kalyan Bharti 2024 exam date
अर्ज फक्त ऑनलाईन प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येतील ऑनलाईन परीक्षेचा दिनांक https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Samaj Kalyan Bharti 2024 official website
वरील पदांचे अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. वरील अर्ज भरण्यासाठी समाज कल्याणच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करण्यात यावा.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळावरील बातम्या मध्ये समाज कल्याण पदभरती २०२४ किंवा social welfare recruitment 2024 असे आहे.
Samaj Kalyan Bharti 2024 exam Fee
१)परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रू.१०००/ अक्षरी रू. एक हजार मात्र
२) परीक्षा शुल्क मागास प्रवर्गासाठी रू. ९००/ अक्षरी रू. नऊशे मात्र
३) माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
४) परीक्षा शुल्क ना परतावा आहे.
५) उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मधील एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे.
Samaj Kalyan Bharti 2024 syllabus
अनु.क्रमांक | विषय | प्रश्न संख्या | गुण |
१ | मराठी | २५ | ५० |
२ | इंग्रजी | २५ | ५० |
३ | सामान्य ज्ञान | २५ | ५० |
४ | बौद्धिक चाचणी | २५ | ५० |
एकूण | १०० | २०० |
Samaj Kalyan Bharti 2024 pdf