अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर : तीन हजारांची मानधन वाढ

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर : तीन हजारांची मानधन वाढ

 अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर : तीन हजारांची मानधन वाढ शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तीन हजारांची, तर मदतनिसांना दोन हजाराची वाढ करण्याचा आदेश काढला आहे. यामुळे १ऑक्टोंबर २०२४ पासून सेविकांना दरमहा १३००० तर मदतनिसांना ७५०० मानधन मिळणार आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या आठ दिवसापासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. सरकार दखल घेत नसल्याने त्यांनी बेमुदत संप सुरु केला होता. अखेर आंदोलनासमोर झुकून सरकारला मानधन वाढीचा निर्णय घ्यावा लागला. मात्र मानधन वाढ अंगणवाडी कर्मचार्यांच्या कामकाजात दोन तासांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार वाढीव कालावधीत सेविका मदतनीस यांनी गर्भवती, स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार, आरोग्य मार्गदर्शन करावे लागणार आहे.

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर : तीन हजारांची मानधन वाढ

Anganwadi sevikana mandhan wadh

गेल्या अनेक महिन्यांपासून अंगणवाडी सेविका मानधन वाढीसाठी संघर्ष करीत होत्या. तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आंदोलन करून त्यांनी लक्ष वेधले. गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत राज्यातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत उपोषणास सुरवात केली होती. याची दाखल घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकित मानधन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याचा तातडीने शासन आदेशही काढण्यात आला. दरम्यान, मानधनवाढ करताना प्रोत्साहन भात्यात मात्र कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. सेविकांना पूर्वीप्रमाणे शून्य ते १० वर्षे वयोगटातील शून्य, ११ ते २० वर्षे वयापर्यंत ३ टक्के, २१ ते ३० वर्षे वयासाठी ४ टक्के, ३० वर्षावरील साठी 5 टक्केच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. मानधन वाढीचा लाभ राज्यातील 1 लाख १० हजार ५५३, तर 1 लाख १० हजार ५५३ मदतनिसांना होणार आहे. मानधन वाढीत केंद्राचा ६० टक्के, राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे.