PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या दिवशी जमा होणार पी एम किसान निधी चा १८ वा हफ्ता

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या दिवशी जमा होणार पी एम किसान निधी चा १८ वा हफ्ता

नमस्कार शेतकरी मित्रानो, पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये मिळत असतात. हे ६००० रुपये २-२ हजार रुपये तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात येतात. यापुढील १८ वा हफ्ता कधी जमा होणार याची तारीख भारत सरकारने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, चला तर जाणून घेऊया PM Kisan Yojana  चा १८ वा  हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार आहे तर.

 Pm kisan yojana :या दिवशी जमा होणार १८ वा हफ्ता

१८ व्या हफ्त्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आक्टोंबर २०२४ ला भेटतील अशी माहिती सरकार ने पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वर दिलेली आहे. शेतकऱ्यांना खूप दिवसांपासून १८ व्या हफ्त्याची वाट पहावी लागत आहे. या अगोदर १७ वा  हफ्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.

सरकार आता ५ ऑक्टोंबर २०२४ ला pm kisan yojana चा १८ व हफ्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. ही रक्कम DBT च्या माध्यमातून जमा होणार आहे.

PM Kisan Yojana ekyc

शेतकरी मित्रानो pm kisan yojana चा १८ वा  हफ्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे.तसेच ekyc करणे आवश्यक आहे. ही ekyc तुम्ही pm kisan yojana च्या वेबसाईट वर जाऊन करू शकता किवा जवळच्या CSC सेंटर ला जाऊन करू शकता. ज्या शेतकर्यांनी ekyc केली नाही त्यांना हा लाभ मिळणार नाही.

pm kisan yojana ekyc official website

शेतकरी मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी ekyc करणे आवश्यक आहे तरी तुम्ही पीएम किसान योजनेच्या खालील  वेबसाईट वर जाऊन ekyc करू शकता.https://pmkisan.gov.in/aadharekyc.aspx