राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी पोर्टल वरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याच बरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उतार्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाही, अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे.
सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. या साठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदारांपैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासाम्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत.यांची ekyc करणेची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त राहिलेले २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ekyc करणे आवश्यक आहे.यापैकी २.३० लाख खातेदार यांनी दिनांक २५/०९/२०२४ अखेर ekyc पूर्ण केली आहे.उर्वरित शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता https:/scagridbt.mahait.org/ या पोर्टल वर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
pm kisan ekyc
- ज्या शेतकऱ्यांचे ekyc करावयाचे आहे. त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्क्कारी संपर्क साधावा. कृषी सहाय्यक त्यांचे लॉगीन मध्ये उपलब्द्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून ekyc करतील.
- तसेच शेतकरी स्वतःसुद्धा या पोर्टल वर जाऊनOTP च्या माध्यमातून किवा Biometric च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात CSC जाऊन सुद्धा ekyc करू शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status येथे click केल्यानंतर शेतकर्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किवा CSC केंद्रातील Biometric मशिनच्या माध्यमातून ekyc पूर्ण करू शकतात.
तरी शेतकऱ्यांनी तत्काळ ekyc करून घ्यावी