कंत्राटी शिक्षक भरती २०२४
राज्यात १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवा निवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सरावाच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. तसेच राज्यात डी एड व बी एड अहर्ता धारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्शकन्की नियुक्ती करणे उचित होणार नाही. यास्तव अशा ठिकाणी संधी द्दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच डी एड व बीएड अहर्ता धारक पात्र असलेल्या शाळेमध्ये डीएड बीएड अहर्ता धारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
kantrati shikshak bharati shasan nirnay
शासन निर्णय:-
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड,बीएड अहर्ताधारक बेरोजगार शिक्षक यांमधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्र. ४ येथील शासन निर्णय दि.०५.०९.२०२४ या निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.
०२. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डीएड,बीएड आहार्ताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी.याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत:-
१. सदर नियुक्तीबाबत शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील.
२.डीएड,बीएड आहार्ताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा सामावेशानाचे/सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार/हक्क नसेल.
३. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नुतनीकरण करता येईल.
४. मानधन रु. १५००० प्रती माह (कोणत्याही इतर लाभांव्यतिरिक्त)
५. एकूण १२ रजा देय (एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विनावेतन असतील ).
६. कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील.
७. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.
८. बंधपत्र /हमीपत्र : नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबधित व्यक्तींची राहील, या आशयाचे बंधपत्र / हमीपत्र घेण्यात यावे. बंधपत्र/ हमिपात्रामध्ये करार पद्धातीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती , विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धातीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परीस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत/आक्षेप राहणार नाही, याचा देखील उल्लेख करण्यात यावा.
९. अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील.
१०. प्रत्येक जिल्हासाठी संबधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र उमेदवारांमधून आवेदन पत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत.
११. सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त (शिक्षण) यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात.
१२.नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
१३. करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी.
१४. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणारे कागदपत्रे /माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.
१५. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील.त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले पराधिकारी वेळोवेळी आढावा घेउन कामाचे मूल्यमापन करतील.सदर मुल्यामापानात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल.
१६. शाळेची पटसंख्या १० पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावार नियुक्त करण्यात आलेले डीएड व बीएड अहर्ता धारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरु राहील.नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची सेवा आपोआप संपुष्टात येईल.
१७. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती,सोपविलेली सेवा पार पडण्याच्या कामात व्याताय निर्माण होईल,अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी.
१८. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील.
१९. ज्या १० व १० पेक्षा कमी पटसंखेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये कार्यरत २ नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी.यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवाजेष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि, कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये.
२०. कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्रप्रमुखांचे असेल.त्यानंतर गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे नियंत्रण असेल.
२१.संदर्भीय शासन पत्र,दिनांक ०७.०७.२०२३ व शासन पत्र,दिनांक १५.०७.२०२४ अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे १० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील.यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून रुपये १५०००/- एवढे राहील.
२२. सदर बाबींवर होणारा खर्च अनुदानातून भागविण्यात यावा.
२३. सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील.
०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकीत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९२३१७१०३००८२१ असा आहे.