Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Exam Postponed
Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Exam Postponed सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी मित्रानो, नगर रचना विभाग भरती २०२४ च्या परीक्षा दिनांकाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे. नगर रचना विभागाच्या अंतर्गत एकूण १२६ पदाची जाहिरात आलेली होती. त्या पदांच्या नियोजित परीक्षा दिनांकात काही बदल करण्यात आलेले आहेत,तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी हा बदल लक्षात घेऊन आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर /नाशिक /छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक ( गट ब ) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब ) (अराजपत्रित ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुषंगाने यापूर्वीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये सदरहू पदांच्या परीक्षा माहे नोव्हेंबर २०२४ मधील दि.२५/११/२०२४, दि.२६/११/२०२४ व दि.२७/११/२०२४ या दिनांकास घेण्याचे नियोजित होते. याप्रमाणे पुढीलप्रमाणे कळविण्यात येत आहे.
Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Exam Update
- रचना सहाय्यक पदाची परीक्षा – सदरची परीक्षा दि. २५,२६ व २७ नोव्हेंबर, २०२४ ऐवजी काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेची नवीन वेळापत्रक यथावकाश नगर रचना आणि मुलानिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी लघुलेखक या पदाच्या परीक्षा दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येत आहेत. या पदाच्या परीक्षांचे प्रवेश पत्र (Hall Ticket ) प्राप्त करून घेण्याबाबत लिंक नजीकच्या कालावधीत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.