Homeguard payment wadh Shasan aadesh : होमगार्डचे मानधन दुप्पट शासन निर्णय
Homeguard payment wadh Shasan aadesh होमगार्डचे मानधन दुप्पट शासन निर्णय महाराष्ट्र राज्यात होमगार्ड संघटनेची स्थापना दिनांक ६ डिसेंबर १९४६ रोजी झाली आहे.सदर संघटनेत स्वतःच्या व्यवसाय व नोकरी सांभाळून स्वयं स्फूर्तीने देशसेवा करण्याच्या उद्देशाने नागरिकांची मानसेवी स्वरूपात होमगार्ड स्वयंसेवक म्हणून भरती करून घेण्यात येते. कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये पोलिसांना सहाय्य करणे, तसेच संप काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास सहाय्य करणे, ही होमगार्ड स्वयंसेवकांची प्रमुख कर्तव्य आहेत. होमगार्ड संघटनेचे कार्य किंवा उद्दिष्ट पार पाडण्यासाठी या संघटनेमध्ये विविध क्षेत्रातील व्यावसायिकांसह रोजंदारीवर काम करणारे कामगार तथा मोलमजुरी करणारे नागरिक इत्यादींची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते राष्ट्रीय सेवा करण्याच्या भावनेने प्रेरित होऊन होमगार्ड संघटनेत स्वयंसेवक म्हणून सामील झालेले आहेत. हे स्वयंसेवक मानसी असल्याने त्यांच्या कर्तव्यापोटी त्यांना मानधन दिले जाते. त्यांच्याकडून होणारे मोलाचे कार्य विचारात घेऊन, होमगार्ड स्वयंसेवकांना देण्यात येणाऱ्या आणि संदर्भ क्रमांक १ व २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या विविध भत्त्यांच्या दरात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
Homeguard payment wadh Shasan aadesh: होमगार्डचे मानधन दुप्पट शासन निर्णय
शासन निर्णय:-
राज्यातील होमगार्ड दलातील स्वयंसेवकांच्या विविध भत्त्यात वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावावर दिनांक ३०-०९-२०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, होमगार्ड दलातील स्वयंसेवकांना दिल्या जाणाऱ्या विविध भत्त्यात खालील तक्त्यातील स्तंभ ४ मध्ये दर्शविल्याप्रमाणे वाढ करण्यास मंजुरी देण्यात येत आहे.
अनु.क्रमांक | होमगार्ड भत्त्याचे प्रकार | सध्याचे दर | प्रस्तावित दर |
१) | कर्तव्य भत्ता | रु.५७०/-प्रतिदिन प्रति होमगार्ड | रु.१०८३ /-प्रतिदिन प्रति होमगार्ड |
२) | उपहार भत्ता | रु.१०० | रु.२०० |
३) | कवायत भत्ता | रु.९० | रु.१८० |
४) | खिसा भत्ता | रु.३५ | रु.१०० |
५) | भोजन भत्ता | रु.१०० | रु.२५० |
०२. ही भत्तेवार दिनांक ०१ आक्टोंबर २०२४ पासून लागू करण्यात येत आहे.
०३. सदरहू सुधारित बत्ती लागू करण्यासाठी सन २०२४-२५ या वर्षाकरिता रुपये ५५२.७१२० कोटी इतकी अतिरिक्त रक्कम मंजूर करण्यास व त्यानंतर दरवर्षी रुपये ७९५.७१२० कोटी रकमेची तरतूद करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
०४. याकरिता होणारा खर्च मागणी क्र.बी.-१ मुख्य लेखाशीर्ष २०७०-इतर प्रशासनिक सेवा (००)(१०७) होमगार्ड (००)(०१) होमगार्ड-दत्तमत (२०७००२८१) २८-व्यावसायिक सेवा या लेखाशीर्षाखाली सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षासाठी मंजूर अर्थसंकल्पीय अनुदानातून भागविण्यात यावा व त्या लेखाशीर्षाखाली दर्शविण्यात.त्यानंतर दरवर्षी होणारा खर्च उपरोक्त लेखाशीच्या खाली त्या त्या वर्षी मंजूर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पीय अनुदानातून भागविण्यात यावा.
०५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००९१३०००७१५२९ असा आहे. हा देश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.