Nagar Rachna vibhag Bharti 2024

Nagar Rachna vibhag Bharti 2024

Nagar Rachna vibhag Bharti 2024 सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मुले निर्धारण विभागाअंतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक /छत्रपती संभाजी नगर/ अमरावती विभागातील अनुरेखक गट (क) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांमधून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १८/१०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच जाहिरात रोजगार व संरोजगार संचालनाच्या https://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध होणार आहे. तरी सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज करावा.

Nagar Rachna vibhag Bharti 2024 total post

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण /नागपूर /नाशिक /छत्रपती संभाजी नगर/ अमरावती विभागातील अनुरेखक गट (क)  या पदाच्या एकूण १२६  पदाची जाहिरात निघाली आहे.

Nagar Rachna vibhag Bharti 2024 pay scale

महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मुल्य निर्धारण विभागाअंतर्गत भरावयाच्या अनुरेखक गट (क) या पदाचे एकूण वेतन श्रेणी वेतनस्तर हा एस ०७, २१७००-६९१०० अधिक नियमानुसार अनुदेय भत्त्ते मिळणार आहेत.

Nagar Rachna vibhag Bharti 2024

Nagar Rachna vibhag Bharti 2024 official website

 महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मुले निर्धारण विभागाअंतर्गत पुणे/ कोकण /नागपूर /नाशिक/ छत्रपती संभाजी नगर/ अमरावती विभागातील अनुरेखक गट (क )संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांमधून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या

https://www.urban.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर दिनांक १८/१०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच जाहिरात रोजगार व संरोजगार संचालनाच्या https://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध होणार आहे.

Nagar Rachna vibhag Bharti 2024 time table

अनु.क्रमाक कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
१ )ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक दि.१८ ऑक्टोंबर २०२४ रोजी ११.०० वाजेपासून
२ )ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
३ )प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल
४ )ऑनलाईन परीक्षेचा दिनांक याबाबत www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल

Nagar Rachna  vibhag Bharti 2024 educational qualification

अनुक्रमांक पद शैक्षणिक व तांत्रिक अहर्ता
१ )अनुरेखक गट (क)शैक्षणिक अहर्ता – उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतेही समतुल्य अहर्ता.

तांत्रिक अहर्ता – मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं संगणक सहाय्यित आराखडा ( आटोक्याड Auto CAD) अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (giographical information system in specialn planning ) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

Nagar Rachna  vibhag Bharti 2024 exam fee

अनुरेखक  या पदासाठी परीक्षा शुल्क अराखीव खुला प्रवर्ग रुपये १००० व राखीव प्रवर्ग रुपये ९०० एवढी परीक्षा शुल्क आहे. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर  अतिरिक्त असतील. माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

Nagar Rachna  vibhag Bharti 2024 age limit

१)फक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

२) मागासवर्गीयांसाठी, खेळाडूंसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांसाठी उमेदवाराच्या बाबतीत वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम राहील. तसेच दिव्यांग भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी उच्चतम वयोमर्यादा ५५ वर्षापर्यंत शिथीलक्षम राहील.

शासन निर्णय क्रमांक मासैक – १०१०/प्र. क्र.२७९/१०/१६- अ दि.२०/०८/२०१० मधील तरतुदीनुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमर्यादेतील सूट ही त्यांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्ष इतकी राहील.

३)मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, माजी सैनिक यांना असलेली वयोमर्यादेतील शिथीलतेचे कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

Nagar Rachna  vibhag Bharti 2024 application last date

नगर रचना व मूल्य निर्धारण विभागांतर्गत आरेखक गट क या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यंत राहणार आहे.